Type Here to Get Search Results !

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारविरोधात संताप .

ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी

🚨 कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारविरोधात संताप 🚨

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलकांना अटक करून सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पोलिसी बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी म्हटले की, “आज आम्हाला अटक करून प्रश्न सुटला असे सरकारला वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा आहे का?”

१८ तारखेला झालेल्या आंदोलनानंतर सरकारने कांद्याच्या दरात ३ रुपयांची वाढ केली होती. तसेच आजच्या शेतकरी एकजुटीचा धसका घेत मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालचाली सुरू झाल्या असून उद्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, हे शेतकरी एकजुटीचे मोठे यश आहे.

शेतकरी नेत्यांनी इशारा देताना सांगितले की, उद्याच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

📌 “कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लढाई आता निर्णायक टप्प्यात”

#ब्रेकिंगन्यूज #चासन्यूजLive #कांदाउत्पादक #शेतकरीआंदोलन #लोकशाही #सरकार #पोलीसप्रशासन #MaharashtraNews

Post a Comment

0 Comments