Type Here to Get Search Results !

स्वच्छ सोनेसांगवी, सुंदर सोनेसांगवी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसादसोनेसांगवी



🟥 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी

🟡 स्वच्छ सोनेसांगवी, सुंदर सोनेसांगवी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोनेसांगवी (ता. शिरूर - आंबेगाव) | प्रतिनिधी

रविवार दि. १७ मे २०२६ रोजी ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत रवीदादा काळे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने “स्वच्छ सोनेसांगवी, सुंदर सोनेसांगवी” या उपक्रमांतर्गत गावातील ओढ्याची मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला.

यावेळी शिवसेना शिरूर-आंबेगाव तालुका प्रमुख व लोकनियुक्त आदर्श सरपंच श्री. मल्हारीशेठ आनंदराव काळे, मा. उपसरपंच श्री. रवीदादा काळे, यात्रा कमिटी अध्यक्ष श्री. दत्तात्रय बोऱ्हाडे, पोलिस पाटील श्री. भानुदास खोमणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शरदराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच युवा उद्योजक श्री. निलेश डांगे, श्री. नवनाथ काळे, श्री. प्रमोद डांगे, श्री. साहिल काळे, श्री. गणेश काळे, श्री. स्वप्निल काळे, श्री. तेजस काळे, तसेच श्री. विकास दाते, श्री. भरत दाते, श्री. गणेश आवटे, कोंडिभाऊ कापरे आदींनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

हा उपक्रम दर रविवारी नियमितपणे राबविण्यात येत असून, गावातील तरुणांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांच्या मनात विशेष आदर आणि अभिमानाची भावना निर्माण होत आहे.

👉 स्वच्छतेच्या या उपक्रमामुळे सोनेसांगवी गाव स्वच्छतेच्या दिशेने आदर्श ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



Post a Comment

0 Comments