Type Here to Get Search Results !

🚨 पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे आश्वासन

🚨 पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे आश्वासन

पुणे | प्रतिनिधी

आज पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यांची भेट घेतली.

बैठकीत मुख्यमंत्री यांनी पुणे–चाकण–नारायणगाव–बोटा–देवठाण–सिन्नर–नाशिक या पूर्वनियोजित मार्गानेच पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गस्थ करण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच जायंट मेट्रेवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) संदर्भात विशेष बैठक घेऊन त्याचा अहवाल केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकप्रतिनिधींनी पुणे–चाकण–नारायणगाव–बोटा–देवठाण–सिन्नर–नाशिक या पूर्वनियोजित मार्गालाच मंजुरी देण्याची ठाम मागणी केली असून, हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी तसेच संबंधित जिल्ह्यांतील सर्व आमदार उपस्थित होते.

चास न्यूज Live मराठी "जनतेच्या प्रश्नांना आमचा आवाज!"

Post a Comment

0 Comments