🔴 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
📰 हेडलाईन:
चांडो येथे वांग्याला भाव नाही; शेतकरी रामदास भाकरे यांची हाक – “खर्चही निघत नाही”
📢 बातमी:
चांडो परिसरातील शेतकरी रामदास कोंडीबा भाकरे यांनी आपल्या शेतात वांगी ‘सुपर गौरव’ या जातीची लागवड केली आहे. उत्तम दर्जाची, आकर्षक आणि सोन्यासारखी दिसणारी वांगी पिकवूनही बाजारात त्यांना योग्य भाव मिळत नाही.
सध्या वांग्याचे दर अत्यंत कमी असल्यामुळे भाकरे यांना आपला माल अगदी कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतीचा खर्च वजा करता हातात काहीच उरत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, “मायबाप सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे आणि योग्य दर मिळवून द्यावा,” अशी विनंती रामदास भाकरे यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments