🔴 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
पत्रकार: विठ्ठल परदेशी
रांजणगावात पोलिसांचा कडकडाट! नियम मोडणाऱ्या २८ वाहनधारकांवर कारवाई
---
🗞️ बातमी:
रांजणगाव परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करत धडाकेबाज मोहीम राबवली आहे. या मोहिमेत नियम मोडणाऱ्या तब्बल २८ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम सुरू करत हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे, कागदपत्रे नसणे अशा विविध नियमभंग करणाऱ्यांना थेट कारवाईचा 'खाक्या' दाखवला. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, परिसरात शिस्त प्रस्थापित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून आला.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना वाहचाचातूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
📢 चास न्यूज Live मराठी — सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या!
#Chas news live Marathi
# CHAS NEWS LIVE MARATHI
Post a Comment
0 Comments