ब्रेकिंग न्यूज
चास न्यूज Live मराठी / शिरूर
मोई (ता. शिरूर) येथे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रभागी राहून गोरगरीब जनतेला मदतीचा हात देणारे दानशूर नेतृत्व म्हणून ओळख असलेले मा. सरपंच तथा विद्यमान चेअरमन व स्वाभिमानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. जीवन शेठ शाडु येळवंडे यांनी पुन्हा एकदा समाजकार्याचा आदर्श घालून दिला आहे.
भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी तब्बल १,५१,००० रुपयांची देणगी दिली असून ही रक्कम आज त्यांच्या परिवाराच्या हस्ते मंदिर कमिटी व यात्रा कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने श्री. येळवंडे यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान आदरणीय नेते श्री. संपतराव पानमंद यांच्या उपस्थितीत तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या सौ. मनीषा किसन सालकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. देणगी उपक्रमासाठी विद्यमान पोलीस पाटील श्री. सुदर्शन शेठ भाकरे पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
श्री. येळवंडे यांनी आपल्या कार्यातून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्या अशा उदार व समाजाभिमुख कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments