ब्रेकिंग न्यूज दि. १६ एप्रिल २०२६ :
२०२२ - २३ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वळसे पाटलांच्या बालेकिल्ला असणाऱ्या पारगाव आणि निरगुडसर या दोन्ही गावांत वळसे पाटलांना धक्का बसला. दोन्ही ग्रामपंचायती हातातून गेल्या.
पारगाव गावची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी सगळ्या पारगाव ग्रामस्थांची इच्छा असताना प्रदीप वळसे यांच्या काही लाभार्थ्यांनी एकही जागा बिनविरोध देणारं नाही, अशी आडमुठी भूमिका मांडली. निवडणुकीचा निकाल लागल्यावर मात्र त्यांना धक्का बसला. स्वतःच्या गावातही अशीच नाचक्की झाली. तिथं सुद्धा रवींद्र वळसे पाटील त्यांच्या नाकावर टिच्चून निवडून आले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत पारगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच श्वेताताई ढोबळे मोठ्या मताधिक्याने पंचायत समितीवर निवडून आल्या. स्वतःच्या गावात पराभव झाल्यानंतर पंचायत समिती गणात सुद्धा वळसे पाटलांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला. आता मात्र वळसे पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली.
मग सुरू झाल्या कारखाना गेस्टहाउस वर बैठका आणि मेजवान्या. पारगावचे उपसरपंच नितीन ढोबळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे फर्मान प्रदीप वळसे यांनी सोडले. आदेश येताच मलिदा गँग कामाला लागली. निकम यांचे कट्टर समर्थक असलेल्या नितीन ढोबळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठीचा प्रस्ताव तहसीलदारांना पाठविण्यात आला. १५ पैकी १२ सदस्य राष्ट्रवादीचे असल्यामुळे निकम यांच्या समर्थकांचे उपसरपंचपद घालवू आणि वळसे पाटलांची शाबासकी मिळवू, अशी स्वप्नं लाभार्थी बघू लागले.
कारखाना आणि इतर सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्याशी संबंधित असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना कामावरून काढू अशा धमक्या देण्यात आल्या. शिक्षकांना देखील दूरवर बदली करू असे धमकावले. या सगळ्या कारस्थानाचे मास्टरमाइंड होते प्रदीप वळसे पाटील. त्यांच्याच इशाऱ्यावर दमदाट्या करून सदस्यांना धमकावणे सुरू होते. यादरम्यान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस मध्ये या १२ सदस्यांच्या अनेक बैठका झाल्या. अविश्वास ठरावाच्या दिवशी प्रदीप वळसे पाटलांच्या उपस्थितीत गेस्ट हाउसवर ग्रामपंचायत सदस्यांच्या हातात बेल भंडारा दिला गेला.
ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावाची प्रक्रिया सुरू झाली. प्रदीप वळसे यांचे चेले अशी ओळख असलेले कारखान्याचे कर्मचारी - ग्रा.सदस्य विठ्ठल ढोबळे यांनी मतदान प्रक्रिया खुल्या पद्धतीने हात वर करून घ्यावी अशी मागणी केली. यावर शिवसेना उपतालुकाप्रमुख, ग्रा.सदस्य किरण ढोबळे यांनी आक्षेप घेतला. मोठ्या प्रमाणावर दबावतंत्र वापरण्यात आल्याचे व यामुळे भविष्यात वादविवाद होतील असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही गुप्त पद्धतीने मतदान घेण्याच्या सूचना केल्या. अविश्वास ठरावासाठी ११ मतांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात १२ सदस्य असताना वळसे पाटील गटाचे असताना फक्त पदरात फक्त १० मते पडली. निकम यांच्या पठ्ठ्याने अविश्वास ठराव हाणून पाडला. गावातल्या सामान्य माणसांमध्ये आनंदी आनंद झाला. नितीन ढोबळे उपसरपंच पदी कायम राहिले.
दुसरीकडे कारखान्याच्या गेस्ट हाउसवर प्रदीप वळसे पाटील आणि मलिदा गँग 12 फेटे, गुलाल आणि DJ लावून सज्ज होते. सगळ्यांचा हिरमोड झाला. सगळ्यांची तोंड पडली. प्रदीप पाटलांचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. हा धक्का बसल्यावर प्रदीप वळसे पाटील काही अजून पर्यंत पुन्हा पारगावात दिसलेले नाहीत. वळसे पाटलांच्या दहशत आणि दमदाटीच्या राजकारणाला ही सणसणीत चपराक आहे.
सध्या पारगावच्या ग्रामस्थांमध्ये एकच चर्चा आहे, की गावाचे निर्णय कारखान्याच्या गेस्ट हाउसवर का घेतले जातात. वारंवार ग्रामपंचायतचे सदस्य कारखान्यावर कशासाठी बोलावले जातात? ग्रामस्थांचे तर म्हणणे आहे, ग्रामपंचायतची मीटिंग सुद्धा गेस्ट हाऊस वरच घेता का ? गावातल्या ठराविक लाभार्थ्यांना हाताशी धरून वळसे पाटील करत असलेल्या घाणेरड्या राजकारणाला हे प्रत्युत्तर आहे.
यातून एक नक्की झालं, गाव करील ते राव काय करील ?
Post a Comment
0 Comments