Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठीराजगुरुनगर प्रतिनिधी :राजगुरुनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात उत्साहपूर्ण वातावरणात ही जयंती साजरी करण्यात आली.या निमित्ताने सकाळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
राजगुरुनगर प्रतिनिधी :

राजगुरुनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात उत्साहपूर्ण वातावरणात ही जयंती साजरी करण्यात आली.

या निमित्ताने सकाळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजजागृतीपर भाषणे, मिरवणूक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास सर्व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सामाजिक एकता व संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

राजगुरुनगर परिसरात शांततेत व उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments