Type Here to Get Search Results !

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ उपक्रम; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे बातमी (चास न्यूज Live मराठी):इंदापूर प्रतिनिधी – विठ्ठल परदेशी




रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ उपक्रम; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन


(चास न्यूज Live मराठी):

प्रतिनिधी – विठ्ठल परदेशी 

इंदापूर तालुक्यातील कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी “युवकांसाठी रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन (प्रयास)” या उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ‘वाहतूक नियम, चिन्हे आणि परवाना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहन चालविण्याच्या पद्धती, वाहतूक नियमांचे महत्त्व आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यांची माहिती देणे हा होता.

या कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथील आर.टी.ओ. निरीक्षक प्रियंका सस्ते या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सिग्नल, ड्रायव्हिंग परवाना तसेच कायदेशीर बाबींबाबत सखोल मार्गदर्शन केले. हेल्मेटचा वापर, नियमांचे पालन आणि जबाबदार वाहनचालक होण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंका निरसन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली असून भविष्यात सुरक्षित वाहनचालक होण्यासाठी प्रेरणा मिळाली.

व्याख्यानादरम्यान वाणिज्य शाखा व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासक्रम समन्वयक डॉ. तेजश्री हुंबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुजाता निंबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश गवळी यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे, प्रा. योगेश खरात, प्रा. महादेव माळवे यांसह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments