चास : बौद्ध विकास तरुण मित्र मंडळ, चास यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा व भीमजयंती निमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना खीर वाटप करून उत्सव साजरा करण्यात आला.
या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आयोजकांनी भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला.
# CHAS NEWS LIVE MARATHI
@chas news live Marathi
Post a Comment
0 Comments