Type Here to Get Search Results !

📰 हेडलाईन्स (Headlines)1. दावडी-निमगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात; आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते .




📍 दावडी -


दावडी-निमगाव रोड ते मांजरेवाडी धर्म स्मशानभूमीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या रस्त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

या रस्त्यामुळे मांजरेवाडी परिसरातील नागरिकांना तसेच धर्म स्मशानभूमीकडे जाणाऱ्या लोकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या अडचणींवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सरपंच कांचनताई मांजरे, उपसरपंच मोहिनी मलगे, माजी सरपंच अनिता मांजरे, भगवान मांजरे, दिनकर मांजरे, युवा उद्योजक जयसिंग भाऊ मांजरे, पत्रकार राजेंद्र मांजरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य शारदाताई मांजरे, अजिंक्य मांजरे, गणेश कातोरे, अशोक मांजरे, योगेश मांजरे, गीता मांजरे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments