मुंबई : आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. २६ वर्षे पूर्ण करून २७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या पक्षाने आपल्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत पुढील वाटचालीचा संकल्प केला.
या प्रसंगी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवास हा केवळ एका राजकीय संघटनेचा नसून पुरोगामी विचारांचा आदर्श वारसा जपत समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचा प्रवास असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाने सातत्याने काम केले असून सामान्य जनतेला न्याय, हक्क आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेत विकास आणि लोकहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. :::
Post a Comment
0 Comments