Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रोहितदादा पवार मैदानात!पंढरपूर येथे अन्नत्याग उपोषणास सुरुवात; भोसे पाटील येथे सदिच्छा भेट .

🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज मराठी

शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या प्रश्नावर आवाज उठवत आमदार रोहितदादा पवार यांनी आज पंढरपूर येथे अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली. उपोषणस्थळी जात असताना भोसे पाटील येथे त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला.

शेतकरी बळीराजाला न्याय मिळावा आणि सरकारने कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकार : मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 

Post a Comment

0 Comments