🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी 🚨
चासकमान धरण 91.29% भरले; भीमा नदीत नियंत्रित पाणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चासकमान, दि. 21 जुलै 2026:
चासकमान धरणाची पाणीसाठा क्षमता सध्या 91.29 टक्के झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.
या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील काही तासांत गरज भासल्यास भीमा नदीपात्रात नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती चासकमान पाटबंधारे विभागाने दिली आहे.
प्रशासनाने भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीतील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, जनावरे व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
जलसंपदा विभागाने सर्व नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment
0 Comments