राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय केळाबाई रामचंद्र चव्हाण यांचा सन्मान
पुणे | प्रतिनिधी
समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले मा. श्री. संजय केळाबाई रामचंद्र चव्हाण यांना "राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार – २०२६" प्रदान करून सन्मानित करण्यात आले. समाजसेवा, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.
विजेता मीडिया, पुणे यांच्या वतीने आयोजित "आदर्श गौरव सन्मान सोहळा – २०२६" मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.
संजय केळाबाई रामचंद्र चव्हाण हे जुन्नर तालुक्यात विशेषतः बंजारा समाज तसेच भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. अलीकडेच त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही लोकहिताचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली असून, समाजसेवा आणि पत्रकारिता या दोन्ही माध्यमांतून जनतेसाठी कार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संजय चव्हाण यांनी सांगितले की, "हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची जबाबदारी वाढवणारा आहे. भविष्यातही समाजसेवा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहीन."
Post a Comment
0 Comments