🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
आंबेगावातील गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणातील फरार १३ आरोपींना तात्काळ अटक करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी
बातमी :
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणातील फरार असलेल्या १३ आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे तसेच मंचर पोलीस निरीक्षक वाघमोडे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
या प्रकरणातील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून, या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments