ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
"जो खड्डे बुजवून देईल, त्याला 2 दिवसांसाठी आमदार-खासदार बनवू!" – खेड-आळंदीतील त्रस्त नागरिकांची अनोखी ऑफर
खेड (प्रतिनिधी): खेड-आळंदी मार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. "जो खड्डे बुजवून देईल, त्याला दोन दिवसांसाठी आमदार किंवा खासदार बनवण्यात येईल," अशी उपरोधिक ऑफर देत नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले.
या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, वारंवार मागणी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप केला.
सध्या रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की, "खड्ड्यात पाणी आहे की पाण्यात खड्डा?" असा प्रश्न वाहनचालक आणि नागरिकांना पडत आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
Post a Comment
0 Comments