🔴 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
“पाणी मिळत नसल्याने आदिवासींचा संताप; कडूस ग्रामपंचायतीविरोधात 27 एप्रिलला आंदोलन”
📰 बातमी:
चास न्यूज Live मराठी प्रतिनिधी – विठ्ठल परदेशी
कडूस (राजगुरुनगर):
खेड तालुक्यातील कडूस गावाजवळील पूशी दरा ठाकर आदिवासी वस्तीमध्ये मूलभूत पाणी सुविधेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिढ्यान् पिढ्या या ठिकाणी वास्तव्यास असूनही अद्याप एकाही घराला नळ कनेक्शन उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
ग्रामपंचायत कडूस मार्फत प्रत्येक घराची घरपट्टी नियमितपणे आकारली जात असतानाही पाणीपुरवठा न मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुलांना दररोज 2 ते 3 किलोमीटर अंतर पार करून पाणी आणावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य व शिक्षण धोक्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे खेड तालुक्याचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर आवाज उठवला असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दि. 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती कार्यालय, राजगुरुनगर येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणीपुरवठ्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.
Post a Comment
0 Comments