🔴 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
🌐 Website: https://chasnewsliv.blogspot.com/
🖊️ पत्रकार – विठ्ठल परदेशी
**कांदा प्रश्नावर वेळ पडल्यास आंदोलन छेडू;
ॲड. विजयसिंह शिंदे पाटलांचा पाचरणेवाडी घाटातून इशारा!**
पाचरणेवाडी (ता. खेड):
राज्यात कांद्याच्या दराचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शेतकऱ्यांना अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, वेळ पडल्यास मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा खेड बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी दिला.
पाचरणेवाडी–आरुडेवाडी येथील बैलगाडा घाटात आयोजित शर्यतीच्या कार्यक्रमात उपस्थित हजारो शेतकरी व युवकांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. सध्या कांद्याला केवळ ६ ते ७ रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या निर्यात धोरणावर टीका करताना शिंदे पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय न घेतल्यास आम्ही शांत बसणार नाही. परिस्थिती अशीच राहिली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी नेहमीच अग्रभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
👉
- कांद्याला मातीमोल भाव; शेतकरी संतप्त
- विजयसिंह शिंदे पाटलांचा आंदोलनाचा इशारा
- पाचरणेवाडी घाटात हजारोंसमोर सरकारवर टीका
- निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह
आणखी न्यूजसाठी भेट द्या 👉 https://chasnewsliv.blogspot.com/
Post a Comment
0 Comments