🔴 हेडलाईन (Breaking News):
शिरूर तालुक्यातील वीज भारनियमन रद्द करण्याची मागणी; महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर .
टाकळी हाजी, जांबुत, मळठण, कान्हूर मेसाई आणि पावळ परिसरातील नागरिक त्रस्त
📢 बातमी :
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी, जांबुत, मळठण, कान्हूर मेसाई आणि पावळ या भागांमध्ये मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या सक्तीच्या वीज भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वीज बंद ठेवली जात असून, दिवसा देखील १ ते २ तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्री. देवदत्त निकम यांनी महावितरणचे प्रादेशिक संचालक मा. सुनील काकडे यांची भेट घेऊन भारनियमन तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी अधिकृत निवेदनही सादर करण्यात आले आहे.
जर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही, तर नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“चास न्यूज LIVE मराठी साठी, मी विठ्ठल परदेशी.”
Post a Comment
0 Comments