🌧️ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 🌧️
टाकळी हाजी होणेवाडी, साळवेवस्ती, घोडेवस्ती, थोरातवस्ती, भैरवनाथ वाडी, भाकरीवाडी परिसरात आज झालेल्या अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
🍌 डाळिंब, केळी, आंबा बागांचे नुकसान
🐄 गायींचे गोठे व घरांची पत्रे उडाली
🏠 अनेक ठिकाणी घरांचे नुकसान
ही माहिती मिळताच गावचे आदर्श सरपंच श्री. दामू अण्णा घोडे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. तसेच तहसीलदार, सर्कल अधिकारी व तलाठी यांना त्वरीत पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
📸 नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी नुकसानीचे फोटो जतन करून ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
📰 प्रतिनिधी : विठ्ठल दत्तात्रेय परदेशी
📍 चास न्यूज Live मराठी
Post a Comment
0 Comments