Type Here to Get Search Results !

राजगुरुनगर येथे आमदार बाबाजीशेठ काळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा .

🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी 🚨

राजगुरुनगर येथे आमदार बाबाजीशेठ काळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील शालिमार पॅलेस येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबाजीशेठ काळे यांनी खत व युरिया विक्रीतील गैरप्रकारांवर कडक भूमिका घेतली.

शेतकऱ्यांकडून युरिया खताच्या गोणीसाठी जास्त पैसे मागणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या आणि साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

आपल्या भाषणात आमदार काळे म्हणाले की, "शेतकऱ्यांची कोणतीही लूट खपवून घेतली जाणार नाही. खत विक्रीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."

या ठाम भूमिकेमुळे उपस्थित शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, साठेबाज व नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बातमी जास्तीत जास्त शेअर करा 
पत्रकार - मा श्री विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 

– चास न्यूज Live मराठी
राजगुरुनगर | ता. खेड | जि. पुणे

Post a Comment

0 Comments