🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी 🚨
चांडोली येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चांडोली येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
या शिबिरात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न, तक्रारी व अर्ज सादर केले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्नांचे जागेवरच मार्गदर्शन व निराकरण करून नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. जनतेच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
बातमी जास्तीत जास्त शेअर करा
Post a Comment
0 Comments