🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अंकुशभाऊ राक्षे यांची निवड
आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे विश्वासू शिलेदार तथा माजी युवा सभापती अंकुशभाऊ राक्षे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री मा.ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.ना. दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते अंकुशभाऊ राक्षे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी पी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा बोत्रे तसेच नगरसेवक शंकर राक्षे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंकुशभाऊ राक्षे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ते प्रभावी नेतृत्व करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बातमी जास्तीत जास्त शेअर करा
Post a Comment
0 Comments