Type Here to Get Search Results !

नाशिक महामार्गावर भीषण अपघात; वाहतूक कोंडीचा मोठा फटका .

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

📰 चास न्यूज Live मराठी

पुणे–नाशिक महामार्गावर भीषण अपघात; वाहतूक कोंडीचा मोठा फटका

आज पुणे–नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या अपघातात कंटेनरने रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने प्रवेश केल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी नागरिक, वाहनचालक तसेच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू होते.

यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.

महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे, वाहनांचा वेग नियंत्रित करणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.

वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

⚠️ जीव मौल्यवान आहे...

सुरक्षित प्रवास हीच खरी जबाबदारी! 🚗🛣️

चास न्यूज Live मराठी
बातमी जास्तीत जास्त शेअर करा 
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी बातमी जास्त जास्त शेअर करा 
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 

Post a Comment

0 Comments