Type Here to Get Search Results !

चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांवर ‘संवाद बैठक’; उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी‌.

ब्रेकिंग न्यूज

चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांवर ‘संवाद बैठक’; उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी

चास न्यूज Live | मराठी
📍 साईसागर हॉटेल, कुरुळी, चाकण MIDC

चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच उद्योगांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘संवाद बैठक’ आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधा, विविध प्रशासकीय अडचणी आणि उद्योगांसमोरील समस्यांबाबत या बैठकीत उद्योजकांनी आपल्या अडचणी व प्रमुख मागण्या आमदार रोहितदादा पवार यांच्यासमोर मांडल्या.

उद्योजकांचे प्रश्न हे केवळ त्यांच्या व्यवसायापुरते मर्यादित नसून, त्यावर हजारो कामगारांची कुटुंबे आणि संपूर्ण परिसराच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योगांना आवश्यक ते पाठबळ देऊन त्यांचे होणारे स्थलांतर थांबवणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले.

एमआयडीसीतील लहान-मोठ्या व्यावसायिकांना भक्कम पाठबळ देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या आणि समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून ठोस व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार रोहितदादा पवार यांनी दिले.

या संवाद बैठकीला चाकण एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित उद्योजकांनी आपल्या समस्या व अडचणी मनमोकळेपणाने मांडत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

उद्योग टिकले तर रोजगार टिकेल आणि रोजगार टिकला तर परिसराचा विकास अधिक वेगाने होईल. त्यामुळे चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या प्रश्नांवर आता प्रशासन आणि शासन स्तरावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चास न्यूज Live | मराठी
📢 चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या प्रश्नांना आता मिळणार का कायमस्वरूपी तोडगा?
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 
बातमी जास्तीत जास्त शेअर करा .पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 
बातमी जास्तीत जास्त शेअर करा ‌

Post a Comment

0 Comments