🔴 ब्रेकिंग न्यूज
चास न्यूज Live मराठी
पाबळमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
पाबळ : शांताई लॉन्स मंगल कार्यालय, पाबळ येथे शांताई लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक श्री. एकनाथ शिंदे, श्रीराम मांदळे व श्री. मंदार किशोर कुमार मांदळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच शिक्षक, पालक व नातेवाईकांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास लोकनेते देवदत्त निकम साहेब यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत निकम साहेब यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक व नातेवाईकांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षणासोबतच मेहनत, शिस्त आणि चांगले संस्कार या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक, पालक व नातेवाईकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला स्नेहमेळाव्याचे उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.
पाबळ परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
📰 बातमीदार : चास न्यूज Live मराठी
बातमी जास्तीत जास्त शेअर करा
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी
Post a Comment
0 Comments