🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी 🚨
प्रति पंढरपूर कडूसमध्ये संतापाची लाट! गोहत्येविरोधात आज कडूसगाव बंदची हाक; धडकणार भव्य मोर्चा
कडूस, ता. खेड : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूस गावात गोहत्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज कडूसगाव बंदची हाक देण्यात आली असून, निषेध नोंदवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि ग्रामस्थ सहभागी होण्याची शक्यता आहे. गोहत्येविरोधात तीव्र आंदोलन करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
गावातील व्यापारी, नागरिक व विविध संघटनांनी बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले असून, आजचा मोर्चा आणि गावबंदकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
— चास न्यूज Live मराठी
सत्य आणि वास्तव तुमच्यापर्यंत!
बातमी जास्तीत जास्त शेअर करा
Post a Comment
0 Comments