*यवतमाळ: उमरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याशिवाय सरसकट मदत द्या - शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*यवतमाळ, दि. ३० सप्टेंबर २०२६ -*
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात यंदा पावसाअभावी भीषण कोरडा दुष्काळ जाहीर झाला असून सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला असून शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
*प्रमुख मागण्या -*
*१)* कोरडा दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी.
*२)* सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये प्रमाणे सरसकट मदत द्यावी.
*३)* हळद आणि ऊस या नगदी पिकांचा समावेश मदत पॅकेजमध्ये करून त्यांनाही हेक्टरी १ लाख प्रमाणे मदत द्यावी.
*४)* प्रत्येक शेतमजूर कुटुंबास तातडीने रु. २५,०००/- थेट बँक खात्यात जमा करावेत.
*५)* कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.
*दिनांक: ३०-०९-२०२६, स्थळ: यवतमाळ
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी
Post a Comment
0 Comments