‘केजरीवाल मॉडेल’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न
पुणे : शिक्षण, आरोग्य आणि पारदर्शक कारभाराचा समग्र वेध घेणारे जस्मिन शाह लिखित ‘केजरीवाल मॉडेल’ या पुस्तकाचा मराठी आवृत्ती प्रकाशन सोहळा आज पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री. प्रकाश जरवाल तसेच तत्कालीन आप दिल्ली सरकारच्या थिंक टँकचे प्रमुख आणि ‘केजरीवाल मॉडेल’ पुस्तकाचे लेखक जस्मिन शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आप महाराष्ट्रच्या वतीने पुस्तकाचे लेखक जस्मिन शाह आणि प्रदेश प्रभारी श्री. प्रकाश जरवाल यांचे आप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. तसेच सम्राट फडणीस, मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह; महेश झगडे, माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन; विजय कुंभार, आरटीआय कार्यकर्ते व प्रदेश उपाध्यक्ष, आप महाराष्ट्र; तसेच शरद अष्टेकर (मधुश्री प्रकाशन) यांचेही स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रदेश प्रभारी श्री. प्रकाश जरवाल आणि प्रकाशक शरद अष्टेकर यांनी ‘केजरीवाल मॉडेल’ पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या विचारांबाबत तसेच आपल्या अनुभवांबाबत उपस्थितांशी संवाद साधला.
‘केजरीवाल मॉडेल’मध्ये शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सेवा आणि पारदर्शक प्रशासन यांसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला असून, दिल्लीतील प्रशासनाच्या अनुभवांचे मराठी वाचकांना पुस्तकाच्या माध्यमातून आकलन होणार आहे.
पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशनामुळे महाराष्ट्रातील वाचकांना या विषयावरील विचार आणि अनुभव मराठी भाषेत उपलब्ध होणार असून, प्रकाशन सोहळ्याला आप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments