🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी 🚨
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा पुन्हा घेण्याची मागणी
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत ऊस उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीने प्रति टन ५० रुपये कपात करू नये, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, सभेतील विषय क्रमांक ९ ते १३ मंजूर न करता सभा गुंडाळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मा. संजय कोलते, साखर आयुक्त यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच वार्षिक सभा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी देवदत्त निकम साहेब यांच्याकडून करण्यात आली.
या मागणीवर साखर आयुक्तांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सभासद व ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
चास न्यूज Live मराठी
Post a Comment
0 Comments